क्राईम

आरणगावात दिवसाढवळ्या घरातील दागिन्यांची चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात प्रवेश करुन घरातील 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहे.

आरणगाव (ता. शिरुर) येथील संतोष जाधव शेतात गेलेले असताना त्यांची पत्नी गावामध्ये गेलेली होती, तर आई आजारी असल्याने बाहेर झोपलेली होती. काही वेळाने संतोष यांची पत्नी घरी आली असता तिला घरातील साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे दिसले. त्यामुळे तिने पती संतोष यांना तुम्ही घरातील सामानांची उचकपाचक केली का असे विचारले. त्यामुळे संतोष यांनी घरात पाहणी केली असता सर्व साहित्य पडलेले तर कपाट उघडे असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कापटाट ठेवलेले पत्नीचे 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत संतोष लक्ष्मण जाधव (वय ४२) रा. आरणगाव (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

11 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago