क्राईम

कोंढव्यात दुचाकींवरून आलेल्या गुंडांची दहशत; ‘आम्ही भाई आहोत, खून करु अशी धमकी

दोघांना अटक, १० ते १२ साथीदारांवर गुन्हा दाखल

पुणे: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा परिसरात सराईत गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दुचाकींवरून आलेल्या गुंडांच्या टोळक्याने “आम्ही या भागातील भाई आहोत. मकोकासारख्या गंभीर गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आलो आहोत. आमच्या नादाला लागलात तर खून करू” अशी उघड धमकी देत नागरिकांमध्ये दहशत माजवली.

या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण (वय २५) आणि सादिक शेख (दोघेही रा. कोंढवा) यांना अटक केली असून, त्यांच्या अन्य १० ते १२ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अंमलदार सूरज शुक्ला यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. मात्र, त्याप्रकरणी १२ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि त्यांचे साथीदार दुचाकींवरून कोंढवा परिसरात दाखल झाले. त्यांनी परिसरात दहशत निर्माण करत हत्यारे व दगडांचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली.

परिसरातील नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, गुंडांनी नागरिकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी अद्याप पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

1 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

1 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

2 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

2 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

2 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

2 तास ago