आकुर्ली: सरकारी अधिकारी असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मुंबईत म्हाडा प्राधिकरणात पती उपनिबंधक आहे. तर महिला शिक्षिका होती. आकुर्ली इथं ही घटना घडलीय. रेणु कटरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे तर बापू कटरे असं उपनिबंधक अधिकाऱ्याचं नाव आहे.
हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्यानं रेणू यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रेणू या पतीसोबत कांदिवलीत उच्चभ्रू सोसायटीत राहत होत्या. आत्महत्येआधी त्यांनी भावाला फोन केला होता. सासरी होणाऱ्या त्रासाबद्दल भावाला सांगितलं होतं. तसंच हा त्रास कधीच थांबणार नाही, मी त्यांना नकोय असं भावाला फोनवरून रेणू यांनी सांगितलं होतं.
रेणू यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी आरोप केला की, बापू कटरे यांनी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं सांगत पत्नी रेणूला अनेकदा हिणवलं होतं. तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही असं म्हणत कमीपणा देण्याचा प्रयत्न केला होता.
हुंडा कमी दिल्यानं सासरी रेणूला टोमणे मारले जात होते. माहेरहून पैसे आणण्यासाठीही तगादा लावला जात असे. लग्नानंतर रेणूच्या वडिलांनी ८ तोळ्यांच्या बांगड्या दिल्या होत्या. २०२३ मध्ये १२ लाख, २०२४ मध्ये १० लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले होते असंही रेणू यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितलं.
बापू कटरे यांच्यासह सासू-सासऱ्यांकडून रेणूचा मानसिक छळ केला जात होता. तिला काठीने मारहाण केली जात होती. वाद मिटवण्यासाठी बैठकही बोलावली होती पण ऐनवेळी बापू कटरे यांनी बैठकीला येणार नसल्याचं सांगितलं. यामुळे अस्वस्थ झालेल्या रेणूने माहेरी फोन केला होता असंही त्यांच्या भावाने सांगितलं.
रेणू यांच्यावर एका डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. त्यांनाही फोन करून रेणू यांनी सांगितलं की, पतीनं फसवलं, तो मिटिंग टाळतोय, मी त्यांना नको आहे. यानंतर रेणू यांनी स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं आणि गळफास घेतला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी रेणू कटरे यांचे पती बापू कटरे यांना अटक केलीय.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…