क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई, तीन ठिकाणी धाड टाकतचार आरोपी जेरबंद अन….

१२ किलो गांजा व ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवत तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून, शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडे पुढील कार्यवाहीसाठी त्यांना ताब्यात देण्यात आले आहे.

पहिली कारवाई टाकळीहाजी येथील दोघांकडून गांजा जप्त….

(दि. २५) जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोघेजण मोटारसायकलवरून गांजाची विक्री करण्यासाठी आमदाबाद फाट्याकडे येणार आहेत.शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचण्यात आला आणि दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यात ४ किलो १८५ ग्रॅम गांजा (किंमत ₹८०,०००/-) जप्त करण्यात आला असून मोटारसायकल सह शुभम शंकर मोहीते (वय २९, रा. टाकळीहाजी)व विजय केमराज काळे (वय २९, रा. टाकळीहाजी) यांच्यावर एन.डी.पी.एस. कायदा १९८५ कलम ८(सी), २०(ब) अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई गुलमोहर अपार्टमेंटमधून गुटखा जप्त….

दुसऱ्या केलेल्या कारवाईत शिरूर येथील गुलमोहर अपार्टमेंट, बुरूड आळी येथे इसम रफिक चाँद शेख याच्या घरावर छापा टाकून वेगवेगळ्या कंपन्यांचा ₹३,५६,७८१/- किमतीचा गुटखा, तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला. हे पदार्थ मानवी आरोग्यास घातक असल्याने त्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.यामध्ये रफिक चाँद शेख (वय ३६, रा. गुलमोहर अपार्टमेंट, शिरूर)यांना अटक केली असून शिरूर पोलीस ठाण्यामध्ये बीएनएस कलम 123, 274, 275, 223 व SSAI अधिनियम 2006 चे कलमे 26(2)(i), 26(2)(ii), 26(2)(iv) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

तिसरी कारवाई शिरूर शहरातील मंगलमूर्ती नगरमधून ८ किलो गांजा जप्त…

दि. २६ जुलै रोजीस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की,इसम रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे हा आपले घरात विक्रीसाठी गांजा साठवून ठेवत आहे. मंगलमूर्ती नगर येथे छापा टाकल्यावर त्याच्या घरातून ८ किलो गांजा (किंमत ₹१,२०,०००/-) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे (वय ३३, रा. कामाठीपुरा, शिरूर) याला अटक करण्यात आले असून एन.डी.पी.एस. कायद्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही तीनही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत पो.नि. संदेश केंजळे,स.पो.नि. कुलदीप संकपाळ, स.पो.नि. दीपक कारंडे, पो.स.ई. दिलीप पवार, पो.स.ई. सागर शेळके, पो.हवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, नाथसाहेब जगताप, नितीन सुदीक, भाग्यश्री जाधव, अमलदार सागर धुमाळ, सचिन भोई आदींचा समावेश होता.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेचे व पोलिसांचे सतर्क गस्तकार्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अवैध धंद्यांवर अशाच कठोर कारवायांची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago