क्राईम

शिरूर तालुक्यात दुचाकी चोरीचा धडाका सुरूच

तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा दोन दुचाकी चोरीला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नागरिकांना तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा एकदा दुचाकी चोरीच्या घटनांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात तिन दुचाकी चोरीच्या घटनांनी शिरूर पोलिस यंत्रणेला धक्का दिला असतानाच, आणखी दोन नवीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

पहिली घटना मांडवगण फराटा येथे (दि. ११) एप्रिल २०२५ रोजी घडली. फिर्यादी हणुमंत गोविंद होले (वय ६७) हे बाजारात गेले असताना त्यांनी आपली स्प्लेंडर प्लस (MH-12-QV-3266) ही दुचाकी बाजार मैदानासमोर पार्क केली होती. बाजार करून परत आल्यानंतर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना १२ एप्रिल रोजी नागरगाव येथील हॉटेल गणेशसमोर घडली. फिर्यादी अमोल श्रीराम नवघरे (वय ३०) हे मुलांना नाश्ता देण्यासाठी गेले असता, त्यांची एचएफ डिलक्स (MH-38-AG-2802) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणात पोलीस तपास सुरु असून अजून आरोपींचा शोध सुरु आहे. मागील काही महिन्यांमध्ये या भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस विभागाने या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 मिनिटे ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

1 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

18 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

22 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

22 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

22 तास ago