क्राईम

शिरूर तालुक्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; दोन आरोपी ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी (दि. ११) उशिरा रात्री धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास नितीन उर्फ देवा सुरज चव्हाण (वय २६, रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) व गणेश तानाजी सांळुखे (वय १९, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी संतोष बाळासो पवार (वय २४, rा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर कोणत्यातरी कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संतोष पवार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत संतोष पवार यांच्या पत्नी साधना संतोष पवार (वय २१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी आरोपींकडे कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करडे व सरदवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

4 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

4 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

4 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

4 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago