ap-mla

आमदाराची मुलगी म्हणाली, पप्पा, मी आंतरजातीय विवाह करणार पण तो गरीब आहे…

देश मुख्य बातम्या

हैद्राबाद (आंध्र प्रदेश): राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आपल्या मुला-मुलींच्या विवाहात वारेमाप पैसा खर्च करताना दिसतात. त्यांच्या मुलांची लग्नं म्हणजे त्यांच्या श्रीमंतीचे एकप्रकारचे जाहीर प्रदर्शनच होत असते. दुसरीकडे मुलांनी जर आंतरजातीय विवाह केला असेल तर खोट्या प्रतिष्ठेपायी अशा मुलांना संपविण्यापर्यंतच्या घटनाही घडल्या आहेत. पण, एका आमदाराने समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे.

राजकारणात अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून ते मंत्र्यांपर्यंतची मंडळी आपल्या मुलामुलींच्या लग्नात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करताना दिसतात. लग्न म्हणजे जणू आपला राजकारणातील प्रभाव दाखविण्याचे एक माध्यम बनले आहे. आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्हा पोड्डुतूर मतदारसंघातील आमदार रचमल्लू शिवप्रसाद रेड्डी यांनी आपल्या मुलीचा विवाह अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने केला.

आमदार रचमल्लू यांची मुलगी पल्लवी हिने शाळेतील मित्राशी प्रेम असल्याचे वडीलांना सांगितले. शिवाय. हा आंतरजातीय विवाह आहे. विवाह ज्याच्याशी होणार तो गरीब घरातील मुलगा आहे. पण, आमदार रचमल्लू शिवप्रसाद रेड्डी यांनी जात किंवा पैसा न पाहता मुलीच्या इच्छेसाठी विवाहाला समंती दिली.

వైఎస్సార్‌ జిల్లా : కుమార్తెకు ఆదర్శ వివాహం చేసిన ఎమ్మెల్యే రాచమల్లు  (ఫొటోలు) | Proddatur MLA Rachamallu Siva Prasad Reddy's Daughter Love  Marriage: Photos - Sakshi

दोघांचा विवाह पोद्दुथुरच्या बोल्वाराम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात थोरामोठ्यांच्या आशीवार्दाने पारंपारिक पद्धतीने झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांची मुलगी पल्लवीसोबत आमदार रचमल्लू स्वत: सब-रजिस्टार कार्यालयात आले आणि त्यांनी दोघांच्या विवाहाला साक्षीदार म्हणून सही करीत विवाहाची नोंदणी केली आणि विवाहाचे प्रमाणपत्र घेतले.

मुलीच्या आनंदासाठी आपल्याला तिचा आंतरजातीय विवाह करण्यात कोणताही संकोच वाटत नसल्याचे सांगत प्रोडडुतुरच्या सर्व लोकांनी दोघांनाही आशीर्वाद द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा एक आदर्श विवाह झाला असून, आपण आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात करायचे ठरविले होते. परंतु, मुलीने तिचे लग्न एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे साधे व्हावे अशी तिने अट घातली होती. त्यामुळे हा आदर्श विवाह सोहळा विशेष ठरला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी पकडला डमी आमदार…

महाराष्ट्रभर चर्चा! अहमदनगर जिल्ह्यात लागले स्मशान भुमित लग्न…

चला साहेब लोक आलेत बिन पगारी अन् फुल अधिकारी; लग्नाला चला…

अहमदनगरमधील विवाहाची जोरदार चर्चा; शुभ मंगल नव्हे तर…

भारतीय युवकाचा चिनी युवतीसोबत प्रेमविवाह; सोशल मीडियावर चर्चा…