शिरूर तालुका

उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड!

पुणे : पुणे शहरातील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे या विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे च्या माजी विद्यार्थ्यांची १९९२ पासून कार्यरत असलेल्या नोंदणीकृत संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक शनिवारी (ता. ६) मोठ्या उत्साहात पार पडली. अनिल ज्ञानदेव खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘विशेष सर्वसाधारण सभेत’ निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मोकाशे, कुंदन पठारे व श्रृती साने यांनी बिनविरोध कार्यकारिणी निवडीची घोषणा केली.

नवनिर्वाचित विश्वस्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
१. गणेश बबनराव काळे
2. अनिल ज्ञानदेव खेतमाळीस
3. मनीषा गोसावी
4. ॲड. देविदास टिळे
5. जीभाऊ शेवाळे
6. निसार चौघुले
7. जे. व्ही. इंगळे
8. शंकर बारवे
9. पुष्पा आरोटे
10. संदीप इंगवले
11. संभाजी सातपुते

कार्यकारिणीच्या सभेत निवडण्यात आलेलेल पदाधिकारी पुढीलप्रमाणे-
1. गणेश बबनराव काळे – अध्यक्ष
2. अनिल ज्ञानदेव खेतमाळीस – उपाध्यक्ष
3. मनीषा गोसावी – सचिव
4. ॲड. देविदास टिळे – खजिनदार

स्वीकृत विश्वस्त पुढीलप्रमाणे-
सुनील चोरे, मनोज गायकवाड, दिनकर वैद्य, अलकनंदा पाटील, सीए संतोष घारे, डॉ. अभय व्यवहारे

दरम्यान, मंडळाने आतापर्यंत कोरोना काळात अन्नदान, कोकणात पूरग्रस्त विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, आशीर्वाद वृक्ष योजना, दिवाळी फराळ वाटप, रक्तदान शिबिरे, समितीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक आर्थिक मदत, उद्योजकता – व्यावसायिक मार्गदर्शन, रक्षाबंधन, मुला-मुलींचे नियमित वार्षिक स्नेहसंमेलन (मेळावे) असे अनेक उपक्रम राबविले आहेत.

मंडळाचे स्थापनेपासूनचे प्रेरणास्तोत असलेल्या दिवंगत कै. रमाकांत तांबोळी यांच्या अपेक्षेप्रमाणे, समितीच्या माजी विद्यार्थ्यांचे यथायोग्य संघटन करून त्यांना पुन्हा समितीच्या मुख्य कार्यप्रवाहात आणण्यासाठी व सर्व प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत अग्रेसर कार्य करण्याचे नियोजन असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष गणेश बबनराव काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, नंदकुमार तळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, जीवराज चोले व अनेक माजी विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते. नवनिर्वाचित सचिव मनिषा गोसावी यांनी आभार मानले.

निमगाव म्हाळुंगी गावचे सुपुत्र आणि युवा उद्योजक गणेश काळे यांचे विविध क्षेत्रांमध्ये मोठे योगदान आहे. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाचा मान प्रथमच गणेश काळे यांच्या माध्यमातून मिळाल्याचा अभिमान आहे, असे निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापू काळे यांनी म्हटले आहे.

निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी

निमगाव म्हाळुंगीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखेचे उदघाटन

निमगाव म्हाळुंगीत वकिलाच्या सतर्कतेने वाचले दोन घोरपडींचे प्राण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

3 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

15 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

16 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago