मानसिक आरोग्य उत्तम कसे राखावे यासाठी जाणून घ्या ५ फायदेशीर टिप्स

आरोग्य

1) पुरेशी झोप घ्या:- मानसिक आरोग्य तज्ज्ञांनुसार, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचे ५ उपाय आहेत. त्यातील पहिला म्हणजे पुरेशी झोप. शांत झोप तुमच्या मनाला सर्वात जास्त आराम देते. डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी झोपणे आणि योग्य वेळी जागे होणे याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. रोज 6-8 तासांची अखंड झोप घ्या.

2) दररोज व्यायाम करा:- शारीरिक स्‍वास्‍थ्य उत्तम ठेवण्‍यासाठी दैनंदिन व्‍यायाम करणे आवश्यक आहे. दररोज किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता, तेव्हा तुमच्या शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे तुम्हाला शांत आणि निरोगी वाटते.

3) सकस आहार घ्या:- संतुलित आणि शांत मनासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असते. आपल्या आहाराचा आपल्या मनावर थेट परिणाम होत असल्याचे अनेक धर्मग्रंथातही सांगितले आहे. त्यामुळे सात्विक आणि सकस आहार घ्या, जेणेकरून तुमचे मन शांत आणि तणावमुक्त राहील.

4) नशेच्या पदार्थांचे सेवन टाळा:- डॉक्टरांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सच्या सवयीमुळे किंवा नशेच्या गोष्टींमुळे तुमच्या मानसिक आरोग्याला सर्वाधिक हानी पोहोचते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यसन टाळावे.

5) लोकांशी संवाद साधत राहा:- तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांच्याशी जितके चांगले संबंध ठेवता तितके तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. म्हणून, लोकांशी बोला आणि आपले विचार शेअर करत राहा. कारण गोष्टी शेअर केल्याने तुमचे मन हलके होते आणि तुम्हाला शांत वाटते.

(सोशल मीडियावरून साभार)