देश

महिलेने पाण्यापासून वाचण्यासाठी खांब पकडला अन् एका क्षणात…

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. पावसामुळे नवी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.

साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत 2 महिला आणि 3 मुले होती. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातही पाणी साचले होते. पाण्यापासून वाचण्यासाठी महिलेने विजेचा खांब पकडला आणि जोराचा धक्का बसला. तिला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.

साक्षीच्या मृत्यूमुळे तिची दोन मुले अनाथ झाली आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अपघाताला रेल्वे जबाबदार असल्याचा साक्षीच्या वडिलांचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

11 तास ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

16 तास ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

2 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago