komal bhawsar
जळगावः शहरातील रौनक कॉलनीतील कोमल वसंत भावसार (वय 30) या उच्चशिक्षित युवतीने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर मुलीला लटकलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे.
कोमलच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पण, पोलिसांना कोमलच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सुसाईट नोट आढळून आली आहे. पोलिसांनी लॅपटॉप आणि सुसाईट नोट जप्त केली असून, पुढील तपास करत आहेत.
कोमल भावसार ही बँकेत अकाऊंटन म्हणून नोकरीला होती. कोमलचे आई आणि भाऊ पुण्यात गेले आहे तर वडील कंपनीत कामाला गेले होते. कोमलचे वडील सायंकाळी कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान, पोलिसांना कोमलच्या लॅपटॉप बॅगमध्ये सुसाईट नोट मिळाली आहे. ‘मम्मी पप्पा सॉरी, मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये,’ अशा आशयाचा मजकूर चिट्ठीत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…