देश

अधिकाऱ्याच्या घरात मिळाले कोट्यवधी रुपयांचे घबाड अन्…

भुवनेश्वर (ओडिशा): एका सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. अधिकाऱ्याच्या तीन घरांमधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

ओडिशा पोलिसांच्या पथकाने ही छापेमारी केली. पोलीस प्रशासकीय अधिकारी प्रसांताकुमार रौतच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही. त्याच्या भुवनेश्वरमधील घराला पोलिसांनी घेराव घातला. काही वेळाने त्याच्या टेरेसमधून शेजाऱ्यांच्या टेरेसवर काही खोके फेकण्यात आल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी तातडीने शेजाऱ्यांच्या घराच्या टेरेसवर धाव घेतली. फेकलेले खोके तपासले असता त्यातून 500 रुपयांच्या नोटांची बंडले सापडली. या 6 खोक्‍यांमधून पोलिसांना 2 कोटी 3 लाखांची रोकड हाती लागली. काही वेळानंतर रौतच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. एकीकडे भुवनेश्वरच्या घरी छापा टाकला जात असताना दुसरीकडे नबरंगपूरमधील त्याच्या घरीही दुसऱ्या एका पथकाने छापा टाकला.

पोलिसांना छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. एका पुस्तकांच्या कपाटाच्या मागे भिंतीमध्ये 10 लाख 37 हजारांची रोकड लपवून ठेवली होती. तसेच, नबरंगपूरच्या घरातून पोलिसांनी 89 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. शेजाऱ्यांच्या घरातूनही नोटांची बंडलं ठेवलेले सहा खोके पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यात 2 कोटी 3 लाखांची रोकड हाती लागली. त्यामुळे एकूण 3 कोटींची रक्कम पोलिसांनी या छाप्यात ताब्यात घेतली. त्याशिवाय, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्तीही पोलिसांनी ताब्यात घेतली.

दरम्यान, ओडिशामध्ये आत्तापर्यंत सरकारी अधिकाऱ्यावर टाकण्यात आलेला दुसरा मोठा छापा मानला जात आहे. ओडिशा प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी प्रसांताकुमार रौत सध्या नबरंगपूर जिल्ह्यात अतिरिक्त उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहे. याआधी गेल्याच वर्षी 10 एप्रिल 2022 रोजी आर्थिक गुन्हे तपास पथकाने गंजम भागातील माजी सहाय्यक अभियंता कार्तिकेश्वर रौलच्या घरून तब्बल 3 कोटी 41 लाखांची रोकड जप्त केली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

16 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago