महाराष्ट्र

Video : गौतमी पाटील हिने बैलासमोर धरला ठेका; कारण…

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. तिच्या अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांनी राडा घातल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. पण, आता गौतमी पाटील ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली असून, तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बैलासमोर नाचताना दिसत आहे.

मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमातील हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात चक्क बैलासमोर गौतमी पाटील नाचत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. कारण, पूर्वीच्या काळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा होती, त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत असे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केल्याचे आयोजकाने म्हटले आहे.

गौतमी बैलासमोर नाचते म्हंटल्यावर ते बघायला हजारोच्या संख्येने नागरिकही जमा झाले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला नाहे. नेटिझन्स व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

दरम्यान, गौतमी पाटील हिचा प्रत्येक कार्यक्रम हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे, तिच्या अनेक कार्यक्रमामध्ये तरुणाईने गोंधळ घातल्याचा, राडा केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता गौतमी पाटील चक्क बैलासमोर नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

10 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

13 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

13 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

13 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

13 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

13 तास ago