गाई पासून माणसांपर्यंत सर्वांना आवडणारा गोरक्षक: शिवशंकर स्वामी

एक काळ असा होता जेव्हा पुण्यात रोज गायींची कत्तल होत असत. कोवळ्या वासरांच्या नाजूक गळ्यांवरुन रोज कसायांचे सुरे फिरायचे अशा वातावरणात मिलींद एकबोटे यांनी गाय आणि गोवंश वाचवायचे शिवधनुष्य हाथी घेत महाराष्ट्रात गोरक्षणाच्या मोहिमा राबवत गोरक्षकांच एक मोठं संघटन उभं केल आणि हजारो गाईंचे आणि गोवंशांचे प्राण वाचवले ते कायदेशीर मार्गाने लाचखोर पोलिस तसेच माजलेले कसाई यांच्या धमक्यांना आणि हल्ल्यांना चोख उत्तर देऊन गोरक्षण मोहिमा धडाक्यात चालू झाल्या त्या अद्याप कायम आहेत.

पुणे जिल्ह्यातून मिलिंद एकबोटे यांनी सुरु केलेल्या या अनोख्या उपक्रमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक युवा गोरक्षक तयार होत होता. त्याचं नाव होत शिवशंकर स्वामी अन आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या गोरक्षण मोहिमा राबवल्या जातात त्याचे नेतृत्व हे शिवशंकर स्वामीच करत असतात. अद्याप पर्यंत हजारो गाय बैल यांनी कत्तलीपासून वाचवले असून गायीची हत्या करणाऱ्या कसायांना कायदेशीर मार्गाने स्वतःचा वेळ आणि कष्ट खर्ची घालून तुरुंगात पाठवले आहे. देशी गोवंश आणि गायीच्या रक्षणासाठी हि व्यक्ती अगदी १२ महिने २४ तास कटिबद्ध असते. कधीही कुणीही फोन केला कि शिवशंकर स्वामी गोरक्षणासाठी तयार. आज पर्यंत अनेकदा मी यांच्या बरोबर गोरक्षण मोहिमांमध्ये भाग घेतलाय.

जितकी काळजी याला गोवंशांच्या जीवाची त्यापेक्षा हि जास्त काळजी याच्याबरोबर काम करणाऱ्या गोरक्षकांची. रात्री आमच्या झोपण्याच्या व्यवस्थेपासून थेट चहा नाष्टा पर्यंत सगळं करणार. आम्हाला झोपायला सांगून स्वतः रस्त्यावर गोरक्षणासाठी रात्रभर जागणार पाऊस थंडी काहीही असो. एखादी संशयास्पद गाडी दिसलीच तरीही ति गाडी धरताना आधी आमच्या सेफ्टी चा विचार करणार. गाडी धरतानाही ति कशी, कुठे, कधी आणि कोण धरणार याचंही नियोजन त्यांच्या कडे तयारच असतं. कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारी गाडी धरली कि गाडी पोलिस चौकित घेऊन जाणार, गोरक्षण कायदा तर काय त्यांना तोंड पाठंच असतो. पोलिस स्टेशन मध्ये तर पोलिस कायदा शोधायच्या आधी हेच त्यांना सगळं सांगून मोकळा अगदी कोणत्या पानावर कुठं काय आहे ते हि त्यांचे तोंड पाठ असतं. आता एवढी तयारी असेल तर पोलिसांना गोवंश तस्करी करणाऱ्यांवर आणि कसायांवर कारवाई करावीच लागते.

गोरक्षणाच्या नावाखाली लाचखोरी करणाऱ्या बनावट लोकांना कसायांकडून पैसे घेताना रंगेहात पकडून त्यांना तुरूंगात पाठवल्या मुळे या असल्या बनावट लोकांवर शिवशंकर स्वामी यांची चांगलीच दहशत आहे. गोरक्षण करताना अनेकदा शिवशंकर यांच्यावर जीवघेणे हल्ले देखील झाले असून अनेकदा ते जखमी देखील झाले, अद्याप पर्यंत कितीतरी वेळा कसायांनी त्यांच्यावर हल्ले केलेत. पण काहिही होऊद्यात अगदी कसायांचे हात पाय तोडून त्यांच्या तावडीतून गाय आणि गोवंश वाचंवणार, अहो स्वतःच्या पोटात तेहतीस कोटी देवता असणाऱ्या साक्षात त्या गोमातेचाच आशीर्वाद आणि याची तिच्यावरील अपार श्रद्धा निष्ठा आणि प्रेम मग यश ते मिळणारंच.

लोकं चोरी, गुंडगीरी, दरोडेखोरी अजून नाही नाही त्या आरोपांत तुरूंगात जातात पण यांनी अनेक वेळा तुरूंगवास भोगला तो गोमातेच्या रक्षणासाठीच, म्हणजे कायदेशीर मार्गाने गाय आणि गोवंश वाचवायचे असेल तरीही लाचखोर पोलिस स्वतःचा धर्मंच नाही तर संविधानही बाजूला ठेऊन गोरक्षकालाच तुरूंगात टाकतात. पण तुरूंगवास भोगूनही न खचता न डगमगता भाऊ परत गोरक्षणासाठी तयार असतात. शिवशंकर स्वामी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी २५ हजार हून अधिक गाई तथा गोवंश व लाखो टन गोमांस कायदेशीर मार्गाने आणि पोलिसांच्या मदतीने कसायांच्या तावडीतून जप्त करणारे भारतातील सर्वात लहान वयाचे गोरक्षक आहे.

अनाधिकृत कत्तलखाने आणि गोमाफियांच्या विरोधात ५०० हून अधिक FIR दाखल करणारे आणि वयाच्या २१ व्या वर्षी पुणे पोलीसांनी जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन पोलीस संरक्षण दिलेले सर्वात लहान गोरक्षण कार्यकर्ते आहे. बेकायदेशीरपणे सतत गोवंशहत्त्या करणारे घटक दुखावल्यामुळे कसायांनी अनेक वेळेला कोट्यावधी रुपायांच्या सुपाऱ्या देऊन हत्त्येचे कट रचले परंतु पोलिस यंत्रणेस प्रत्येक वेळी माहिती मिळाल्याने समाजकंटकांचे कोणतेही कारस्थान यशस्वी होऊ शकले नाही. शिवशंकर स्वामी या गोरक्षकाच्या कार्याची दखल घेत अद्याप पर्यंत सलग तिन वेळा उच्चन्यायालय मुंबई यांच्या कडून त्यांना मानद पशुकल्याण अधिकारी पदवी बहाल करण्यात आली आहे.

शेरखान शेख यांना स्वामींमुळेच गो रक्षणाची प्रेरणा….
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेरखान शेख हे गोरक्षणाचे कार्य करत असून त्यांनी अनेक गोमातेंना कत्तलीपासून जीवदान देत कत्तली साठी गोवंश पुरविणाऱ्या लोकांना जेल ची हवा खायला लावली आहे. मात्र शेरखान शेख यांना शिवशंकर स्वामी यांच्याकडूनच गोरक्षणाची प्रेरणा मिळाल्याचे शेरखान शेख सांगतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 तास ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

13 तास ago

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

14 तास ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

16 तास ago

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात…

16 तास ago

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…

23 तास ago