मनोरंजन

मी लग्न केलं तर गायिकेशीच! बिग बॉस मराठीच्या घरात राकेश बापटची खास इच्छा

मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता राकेश बापट सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मुळे चर्चेत आहे. घरातील त्याचा शांत, समंजस आणि सुसंस्कृत वावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच आता राकेशने आपल्या खासगी आयुष्यातील एक इच्छा उघड केली असून, त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कलर्स मराठी वाहिनीनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये राकेश बापट प्राजक्ता शुक्रे आणि दीपाली सय्यद यांच्याशी गप्पा मारताना दिसतो. यावेळी भविष्यातील जोडीदाराबद्दल बोलताना तो म्हणतो,“मी जर कधी लग्न केलं, तर एका गायिकेशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ते ऐकत बसेन. सकाळी ओले केस मोकळे सोडून साडी नेसून तानपुरा वाजवत गाणारी बायको मला खूप आवडेल.”

राकेशच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून त्याच्या ‘ड्रीम पार्टनर’ची चर्चा रंगली आहे. उल्लेखनीय म्हणजे, राकेश बापट यापूर्वी हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री रिद्धी डोगरा यांच्याशी विवाहबद्ध होता. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बिग बॉस OTT दरम्यान अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं, मात्र ते नातं फार काळ टिकू शकलं नाही.

दरम्यान, बिग बॉस मराठीपूर्वी राकेश बापट ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकला होता. या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

7 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

8 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

11 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

11 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago