मनोरंजन

पंकजा मुंडेंची राजकारणातुन थेट छोट्या पडद्यावर एंट्री!

मुंबई: सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो. काही काळापासून बंद असलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमोचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेत्री नव्हेतर एक दिग्गज महिला राजकारणी करणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचे हे आठवे वर्ष असेल. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज महिला ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे, अशा महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो.

यावर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा भाजपा नेत्या पंकजा मुंडे सांभाळणार आहेत. ज्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. पंकजा मुंडेंसोबत अभिनेत्री क्रांती रेडकरही सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकरची जुगलबंदी पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

5 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

5 तास ago