महाराष्ट्र

वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी…

मुंबई: 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. कधीही भूक लागली तर चौकाचौकात मिळणाऱ्या वडापाव विकून कोट्यवधींची उलाढाल असणारा व्यवसाय सुरु करणाऱ्याविषयी माहिती असायलाच हवी. गोली वडापाव नावाने देशभर 350 आउटलेट्स असणाऱ्या वडापाव चेनची सुरुवात कल्याणमध्ये कशी झाली आणि वडापाव विकून 50 कोटींची उलाढाल कशी करतो याची प्रेरक कथा आहे.

काही मुलांना शिकण्याची आवड नसते. त्यामुळे घरीदारी त्यांना त्यावरुन ऐकून घ्यावं लागतं. सारखं हिणवलं जातं, टोमणे मारले जातात. मुंबईतल्या एका मुलालाही असंच सतत ऐकून घ्यावं लागत होतं. त्याचे वडील त्याला म्हणायचे शिकला नाहीस, तर वडापाव विकावा लागेल. या पठ्ठ्याने ते शब्द खरे करुन दाखवलेच. पण त्यात इतकं यश कमावलं की त्याच्या वडापावच्या कंपनीची उलाढाल तब्बल 50 कोटींची आहे आणि देशभरात 350 आउटलेट्स आहेत. त्यांच्या कंपनीचं उदाहरण हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयएसबी हैद्राबाद, आयएमडी स्वित्झर्लंड अशा अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये दिलं जातं. आता अनेक मुलांचे आईबाप त्याचं उदाहरण आपल्या मुलांना देतात. या वडापावच्या कंपनीचं नाव आहे. गोली वडापाव आणि याचे संस्थापक व्यंकटेश अय्यर आहेत.

एका मध्यमवर्गीय तमिळ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या व्यंकटेश यांनी चांगलं शिकून डॉक्टर, इंजिनीअर किंवा सीए व्हावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण व्यंकटेश यांना डॉक्टर, इंजिनीअर होण्यात फारसा रस नव्हता. त्यांनी पदवी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि फायनान्स क्षेत्रात नोकरी सुरु केली. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यांनी रिटेल क्षेत्रात आपला अनुभव पक्का असावा यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. चांगला अनुभव मिळाल्यावर त्यांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं. व्यवसाय कोणता निवडला तर वडापावचा. जे लहानपणी त्यांचे वडील त्यांना उपहासानं म्हणायचे.

फेब्रुवारी 2004 मध्ये व्यंकटेश अय्यर यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये गोली वडापावचं पहिलं आउटलेट सुरु केलं. आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त गरजू लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. कॉलेज पार्टी ते क्रिकेट मॅचपर्यंत वडापाव पहिल्या पसंतीचा पदार्थ – घरी इडली, डोसा, पोंगल असे पदार्थ रोजच खाले जात असत. पण मुंबईत बाहेर सर्वत्र एक पदार्थ दिसतो तो म्हणजे वडापाव.

कॉलेज पार्टी ते क्रिकेट मॅचपर्यंत सगळे जण आवडीनं वडापाव खातात. गर्दी खेचणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे हाच वडापाव आपण विकायचं असं ठरवल्याचं व्यंकटेश अय्यर सांगतात. गोली वडापावच्या आउटलेटवर त्यांनी वडापावचे काही नवीन प्रकारही उपलब्ध केले आहेत. त्यामध्ये पनीर वडापाव, शेजवान, मिक्स व्हेज, पालक मका असे अनोखे प्रकार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक आउटलेटवर सर्व पदार्थांची चव सारखीच असते. असं पडलं गोली वडा पाव नाव – व्यंकटेश अय्यर यांनी हा व्यवसाय सुरु करायचं ठरवलं तेव्हा लोकांशी चर्चा सुरु केली. तेव्हा नेहमी त्यांना विचारलं जायचं काय गोल देणार आहात?

बटाटेवडा करताना बटाटयाच्या सारणाचा चपटा गोळा बेसनाच्या पिठात घालून तळला जातो. त्याला गोळी म्हणतात. हे त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी आपल्या कंपनीच्या नावात गोली हे नाव असलं पाहिजे हे नक्की केलं होतं. अशाप्रकारे त्यांच्या कंपनीचं नाव गोली वडा पाव ठरलं. नारायण मूर्ती यांचा प्रभाव- आपल्या कंपनीत शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलांना, आपल्या कंपनीत नोकरी देण्यावर व्यंकटेश अय्यर यांचा भर आहे. गरीब मुलांच्या शिक्षणासाठीही ते मदत करतात. त्यांच्या कंपनीत ‘थ्री ई’ म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि आंत्रप्रिन्युअरशिप यांना महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना शेअर्स देऊन त्यांनाही कंपनीचे भागीदार बनवणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्यंकटेश अय्यर यांच्यावर मोठा प्रभाव असून, त्यांना ते आदर्श मानतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

4 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

4 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

4 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago