नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड यांनी आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गंभीर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशा शब्दांत दिलेली धमकी ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून राज्याच्या वैचारिक परंपरेलाच आव्हान देणारी आहे.
तसेच, दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ देणारी भाषा वापरणे गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास लक्षात घेता, प्रकाश आंबी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतरही शासनाने मौन का बाळगले आहे, असा सवाल उपस्थित करत, गृहखात्याने तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…