मनोरंजन

अजित दादांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक; ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर अश्रूंनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळासह मराठी मनोरंजन विश्वातूनही तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अनेक कलाकारांनी भावुक शब्दांत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता रितेश देशमुख अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीला उपस्थित होता. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी मंचावर उभं राहून त्याने अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रितेश भावुक झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.

“२८ जानेवारीचा सूर्य ‘सकाळ’ घेऊन येण्याऐवजी ‘काळरात्र’ घेऊन आला,” असे शब्द वापरत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. “अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ होते. त्यांच्या शब्दात ताकद होती, नजरेत धाक होता आणि मनात माणुसकी होती. त्यांच्या जाण्याने आज महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे,” असं तो म्हणाला.

अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करताना रितेश म्हणाला, “शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अजित दादा. अनेक वर्षे रखडलेली कामं त्यांच्या एका आदेशावर मार्गी लागत. म्हणूनच ते सामान्य माणसाच्या आयुष्यातील ‘कामाचा माणूस’ होते.” शेवटी, “दादा तुम्ही कालही प्रेरणा होतात, आजही आहात आणि उद्याही राहाल,” असे म्हणत त्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.

दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर ३१ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

10 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago