मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज (३१ जानेवारी) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.
शपथविधीनंतर अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावर आपलं स्पष्ट आणि संवेदनशील मत मांडलं आहे. अंकिता वालावलकर लिहिते, “सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात, तर काहीजण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत.”
तिने पुढे सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर भाष्य करत म्हटलं आहे की, “ट्रोल करणं खूप सोपं असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवतेय, तिच्या मनात काय चाललंय, हे आपण जाणत नाही. संवेदनशीलता आणि समजूतदारपणा आज फार गरजेचा आहे. राजकारणात टीका होणारच, पण व्यक्तिगत दुःखावर उपहास करणं समाजाचं प्रतिबिंब दाखवतं.”
दरम्यान, राज्याच्या ११व्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती सोपवण्यात आली आहेत. मात्र, अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ व नियोजन खातं सध्या त्यांना देण्यात आलेलं नाही. हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून ये
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…