इतर

वैयक्तिक कर्ज घेताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मुंबई: पैशाची गरज भागवण्यासाठी लोक कर्जाची मदत घेतात. आजारपण, घर खरेदी, शिक्षण, मुलांची लग्नं लग्नासाठी किंवा इतर कारणांसाठी लोकांना कर्ज घ्यावं लागतं. तस वैयक्तिक कर्ज घेणं नक्कीच सोपं आहे, परंतु जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरु शकतं.

वैयक्तिक कर्ज म्हणजे नक्की काय…?
वैयक्तिक कर्ज हे खरेतर असुरक्षित कर्ज मानलं जातं. याचा अर्थ सोनेतारण आणि गृहकर्ज याप्रमाणे जमा करण्यासाठी कोणत्याही तारण किंवा सुरक्षा आवश्यक नसते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, कर्जदाराला कोणतीही हमी घेण्याची किंवा काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारणपणे 12 ते 60 महिन्यांचा असतो. हे कर्ज वैद्यकीय आणीबाणी, लग्न किंवा शिक्षण खर्च यासारख्या कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलं जाऊ शकते.

व्याज दरावर द्या लक्ष
वैयक्तिक कर्ज घेताना व्याजदराची व्यवस्थित माहिती करुन घ्या. कारण वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जापेक्षा जास्त असतात. ते 10 ते 24 टक्क्यांपर्यंत असू शकतात. व्याजदर जितका जास्त असेल तितका तुमचा EMI जास्त असेल. अशा स्थितीत सर्वप्रथम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जिथे सर्वात कमी व्याजदर असेल तिथून पर्सनल लोन घ्या.

वेळेवर पैसे भरा
वैयक्तिक कर्ज कोणत्याही कारणासाठी घेतलं असलं तरी त्याचा हप्ता विलंब न लावता वेळेवर जमा होईल याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण हप्ते वेळेत जमा न झाल्यास किंवा थकल्यास त्यामुळं भविष्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना तुम्हाला अडचण येऊ शकते. वास्तविक, याचं कारण म्हणजे वेळेवर पेमेंट न केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. खराब क्रेडिट स्कोअरमुळे भविष्यात कर्ज मिळणं कठीण होतं, कारण बहुतेक कर्जदाते याच आधारावर कर्ज मंजूर करतात.

परतफेड करता येईल तेवढंच कर्ज घ्या
कोणत्याही कर्जाचं जाळं सहसा खूप वाईट असतं. कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते की, आपण ईएमआय भरण्यास असमर्थ ठरतो. अशा परिस्थितीत तुम्ही घेतलेलं कर्ज डोकेदुखी ठरतं. म्हणूनच सहज उपलब्ध होणारं पर्सनल लोन घेताना हे लक्षात ठेवावं की तुम्हाला आवश्यक तेवढंच कर्ज घ्या. म्हणजेच जेवढी रक्कम सहज भरता येईल तेवढेच कर्ज घ्या.

कर्ज किती वर्षांसाठी घ्यायचं…?
वैयक्तिक कर्ज घेताना, तुम्हाला कोणत्या कालावधीसाठी कर्ज घ्यायचं आहे हे देखील लक्षात ठेवा. दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेतल्याचा अर्थ असा आहे की तुमचा EMI कमी असेल. परंतु तुम्हाला ते दीर्घ काळासाठी भरावं लागेल आणि अधिक व्याज देखील द्यावं लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही परतफेडीचा कालावधी कमी ठेवला, तर ईएमआय नक्कीच जास्त असेल, परंतु व्याज कमी भरावं लागेल. अशा परिस्थितीत, तुमच्या गरजेनुसार, वैयक्तिक कर्जाचा कालावधी निवडा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

20 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

20 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

1 दिवस ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

2 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

2 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

2 दिवस ago