मनोरंजन

आदर होता… पण अपेक्षांनी नातं तुटल; राकेश बापट-रिधी डोगरा घटस्फोटामागचं खरं कारण समोर

मुंबई: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेला राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनमध्ये सहभागी झाला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.याआधी तो हिंदी ‘बिग बॉस’मध्येही झळकला होता. अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्याचीही नेहमी चर्चा होत असते. विशेषतः त्याचं आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिधी डोगरा यांचं नातं चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलं आहे.

२०११ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीने आठ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत. तरीही एवढी गोड जोडी वेगळी का झाली, हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता.याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राकेशची बहीण शीतल हिने महत्त्वाचा खुलासा केला. तिच्या म्हणण्यानुसार, “राकेश आणि रिधी यांच्या नात्यात परस्परांबद्दल खूप आदर होता. पण काळानुसार अपेक्षा वाढल्या आणि त्यातूनच दुरावा निर्माण झाला. नातं जबरदस्तीने टिकवण्यापेक्षा शांततेत वेगळं होणं त्यांनी पसंत केलं.”

ती पुढे म्हणाली की, “नातं एका टप्प्यावर विषारी बनू नये, हीच दोघांची भूमिका होती. राकेश कुणाचाही तिरस्कार करू शकत नाही आणि रिधीचाही स्वभाव तसाच आहे. त्यामुळे घटस्फोटानंतरही त्यांच्यात चांगली मैत्री कायम आहे.”दरम्यान, एका मुलाखतीत रिधीनेही सांगितलं होतं की, “आजही एखादी अडचण आली तर मी राकेशकडून मदत घेते.”एकेकाळी सेटवर सुरू झालेलं प्रेम, लग्न आणि त्यानंतरचा वेगळा मार्ग—या दोघांची कहाणी आजही चाहत्यांसाठी तितकीच भावनिक आणि प्रेरणादायी ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago