भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लवकरच चांगली बातमी मिळेल, लग्नासाठी स्थळ चालून येईल.

वृषभ: व्यापाराच्या संबंधित व्यक्तींना मोठा लाभ होईल. नोकरीत पदोन्नतीसाठी अधिक मेहनत कराल. प्रेमी जोडीदाराकडून लग्नाचा प्रस्ताव येईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे स्थळ मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे.

मिथुन: बऱ्याच दिवसांनी मित्र-मैत्रिणीची भेट होईल. पोटाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीत यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत कराल. प्रेमी जोडप्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. गरीबांना अन्न, वस्त्र दान करा. आजचा शुभ रंग – नारंगी.

कर्क: व्यापाऱ्यांनी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्य सुदृढ राहील. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कार्यालयात नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढेल आणि नाराजी दूर होईल.

सिंह: व्यापारात मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. गरीबांना अन्न दान करा. वाद-विवाद टाळा. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्याल.

कन्या: आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात वाढ होण्यासाठी प्रयत्न कराल. प्रेमळ जोडीदार जवळ असतानाही काही प्रमाणात प्रेमाची कमी जाणवेल. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर येईल. वाहन खरेदीचं नियोजन कराल.

तूळ: आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. घरात प्रेमळ वातावरण असेल. सासुरवाडीतून आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक: आर्थिक स्थिती चांगली राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. ब्रेकअप किंवा घटस्फोट याच्या संबंधित गोष्टींच्या आठवणी ताज्या होतील. आज एखाद्या व्यक्तीकडून सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.

धनु: व्यापारात मोठी वाढ होईल आणि धनलाभ होईल. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. आई-वडिलांसोबत वाद होऊ शकतात. श्री गणेशाची पूजा करा. गरीबांना अन्न, कपडे दान करा.

मकर: कंत्राटदारांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यालयात सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळेल. अविवाहितांच्या लग्न जुळण्यास काहीसा उशीर होईल. स्वभावात चिडचिड वाढेल.

कुंभ: उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. आजारी पडण्याची शक्यता आहे, आरोग्याची काळजी घ्या. तरुणांना नोकरीची संधी मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.

मीन: व्यापारात वाढ होईल, व्यापाराच्या संबंधित परदेश दौरा होण्याची शक्यता आहे. ऑफिस तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जबाबदारी सोपवली जाईल. लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

1 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

1 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

4 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

5 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

8 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

11 तास ago