शिरुर (तेजस फडके): शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याकरीता वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाने अनुदानाच्या रकमेत वाढ केलेली असून 50 हजार रुपयां ऐवजी 75 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिध्देश ढवळे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. याकरिता mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. त्यामध्ये सिंचन साधने व सुविधा या घटकाखाली वैयक्तिक शेततळे हे निवडावे. त्यानंतर इनलेट आऊटलेट सह अथवा इनलेट आऊटलेट विरहीत हा पर्याय निवडुन आकारमान व स्लोप निवडावा.
महाडीबीटी पोर्टलवर सोडतद्वारे निवड लाभार्थीची करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या नावे 60 गुंठे क्षेत्र असणे अनिवार्य असून शेततळ्यासाठी जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य असावी. तसेच यापुर्वी मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे अशा विविध योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
शिरूर तालुक्यासाठी सर्वसाधारण 95 शेततळ्यास मंजूरी मिळणार असून जवळपास 70 लाख निधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी माहिती शिरुर तालुका कृषि अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर शेततळे अस्तरीकरण, कृषि यांत्रिकीकरण, ठिबक/तुषार संच, कांदाचाळ, शेडनेट/पॉलीहाऊस व इतर योजनांचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…