भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट येणार असून काम वाढणार आहे. आज काही कारणामुळे स्वभावात चिडचिडपणा येऊ शकतो. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. सासरकडून धन मिळण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

वृषभ: आजचा दिवस चांगला असून बँक बॅलन्स वाढणार आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत तुम्ही बदलाचा विचार करत असाल तर वेळ उत्तम आहे. कुटुंबात आनंद असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आहे.

मिथुन: आजचा दिवस चांगला असून नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला सगळ्यांकडून मदत मिळेल. खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील तसेच नवे पेहराव खरेदी करणे याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष कराल. आळस टाळून कामाला लागा तरच कामे पटापट मार्गी लागतील.

कर्क: आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही राजकारणात असाल तर तुमचा मानसन्मान आज वाढेल. तुमची रणनीती यशस्वी झाल्यामुळे कौतुक होईल. तुम्हाला आज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी वाचनात वेळ व्यतीत करणार आहात. सकारात्मक विचार करा तुम्हाला झोपेचा त्रास होणार नाही.

सिंह: आजचा दिवस उत्तम आहे. घरी मंगलकार्याचे आयोजन होणार असून मन प्रसन्न असेल. आज तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. मित्रांच्या मदतीमुळे व्यवसायात जास्त कमाई करण्याचे मार्ग खुले होतील. अचानक मोठी रक्कम हाती पडणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल.

कन्या: आजचा दिवस मेहनतीचा आहे. तुम्हाला वाटत असेल काम पूर्ण व्हावे तर अधिक परिश्रम करावे लागतील. आज बुद्धी चातुर्याने तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असणार आहेत. मुले उच्च शिक्षणात चांगले यश मिळवतील. संध्याकाळी धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात कामे वाढत आहेत नियोजन नीट करावे.

तुळ: आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही कार्य करावे लागेल, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल. कुटुंबात सुख-शांती असेल. अचानक काही कारणामुळे खर्च वाढणार आहेत. नोकरीत असाल, तर अधिकारी वर्गाकडून तुम्हाला कामात मदत मिळेल. धार्मिक कार्यात रुची घेणार आहात. रात्री एखाद्या मंगलकार्यात जाणार आहात.

वृश्चिक: आजचा दिवस ठिक आहे. आईच्या आशिर्वादामुळे तुम्हाला व्यवसायात लाभ होईल. तुमचे पेंडीग पेमेट आज होणार आहे. कोर्ट कचेरी सुरु असेल तर निकाल तुमच्याबाजूने लागेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. घरात वातावरण ठिक असून खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: आजचा दिवस ठिक मेहनतीचा आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात आज खूप काम आहे. तसेच कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. आज संवात साधताना सतर्क राहा. संपत्तीवरुन कुटुंबात वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. भावंडासोबत वाद झाला तर अपशब्दांचा वापर करु नका. व्यवसायात आज चिडचिड होण्याची शक्यता आहे.

मकर: आजचा दिवस चांगला असून तुमच्या मान आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. आजच्या दिवशी तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. विरोधक आज फार काही करणार नाहीत. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे गुंतवणुकिचा विचार करु शकता.

कुंभ: आजचा दिवस ठिक असून तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. कार्यक्षेत्रात अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. तुमची संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. पत्नीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी धार्मिक कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. आज स्वतःला उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा.

मीन: आजचा दिवस संमिश्र आहे. धार्मिक कार्यात अधिक रुची घेणार आहात. तुम्ही आज जास्त खर्च करणार आहात, त्यावर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. संपत्ती कमविण्याचे नवे मार्ग खुले होतील त्याचा लाभ घ्या. व्यवसायात अधिक गुंतवणूक करा लाभ होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago