क्राईम

शिरूर तालुक्यात बांगलादेशी नागरिकांची गँग पकडली; मतदानकार्ड, पॅनकार्ड…

शिरूर (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वास्तव्यास असलेल्या 21 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींपैकी 09 जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी दिली.

अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान वय -50), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (वय – 32), शफिकउल अलीमिया शेख (वय- 20), हुसेन मुखिद शेख (वय – 30), तरिकुल अतियार शेख (वय – 38), मोहम्मद उमर फारूखः बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख (वय 32), शाहिन शहाजान शेख (वय – 44), मोहम्मद हुसेन शेख (वय – 32), रौफ अकबर दफादार (वय 35), इब्राहिम काजोल शेख (वय 35), फरीद अब्यास शेख वय – 48), मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती (वय – 35) मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार (वय – 32), आलीमिया तोहकील शेख (वय – 60), मोहम्मद इसराईल फकीर (वय -35), फिरोजा मुताकीन शेख (वय 20), लिपीया हसमुख मुल्ला (वय – 32), सलमा मलीक रोशन मलीक (वय 23), हिना मुल्ला जुल्फोंकार मुल्ला (वय 40), सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश (वय 30), येअणुर शहदाता मुल्ला (वय – 25, सर्व सध्या रा. कोरेगाव, ता. शिरुर, जि.पुणे, मुळ रा. बांगलादेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पुरुष व महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 21) दहशतवाद विरोधी शाखेचे पथक रांजणगाव पोलिस स्टेशन परिसरात गस्त घालीत होते. यावेळी पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, गंजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरीक हे बेकायदेशीरपणे राहत आहेत. मिळालेली माहिती वरिष्ठांना तसेच गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस स्टाफसह कारेगाव परीसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसमांचा शोध घेतला असता कारेगावच्या हद्दीमध्ये भाड्याने राहण्यास असणारे 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता हे सर्वजण बांगलादेशी नागरीक असून त्यांनी भारत बांगलादेश सिंमा ओलांडुन कोणताही वैद्य भारतीय पारपत्र परवाना धारण करत नसताना देखील भारतामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला. कारेगाव (ता. शिरूर) येथे बनावट भारतीय देशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड धारण करून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यापैकी 09 जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व एकाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे.

या प्रकरणी रांजणगाव पोलिस स्टेशनला वरील व्यक्तीच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींना शिरुर कोर्टात हजर केले असता कोर्टाने गुरुवारपर्यत (ता. 24) पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस करीत आहेत

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर विभाग, प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, सहा. फौजदार विशाल गव्हाणे, पोलिस हवालदार विशाल भोरडे, रविंद्र जाधव, मौसीन शेख, ओंकार शिंदे, तसेच रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहायक फौजदार डी. आर. शिंदे, विजय सरजीने, विलास आंबेकर, उमेश कुतवळ, विद्या बनकर, शितल रौधळ यांचे पथकाने केली आहे.

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

9 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

9 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

9 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

9 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

14 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

14 तास ago