भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करु शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या.

वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरु शकेल.

मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरु करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

कर्क: मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल.

सिंह: घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करु नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

कन्या: घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

तुळ: ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल.

वृश्चिक: आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.

धनु: व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.

मकर: कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल.

कुंभ: गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल.

मीन: आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

9 मिनिटे ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

1 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

2 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

2 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

2 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

6 तास ago