मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात कंपनीचे शटरचे लॉक तोडून ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील सणसवाडी गावच्या हद्दीत गट.न ९४८ मध्ये असणाऱ्या चॅम्पियन शुगरकेन इनफिल्डर अँड ट्रेलर कंपनीचे पत्र्याच्या शॉपचे शटरचे लॉक ग्राइंडरने तोडत कंपनीमध्ये शिरुन शुगर केन इन्फिल्डर मशीन व इतर मटेरियल असा एकूण ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना (दि १३ जून) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

याबाबत बाबासाहेब दादासाहेब निमसे (वय४९,रा. इकोग्राम सोसायटी, शिक्रापूर) यांच्या फिर्यादीवरून हरीश बाळासाहेब शिंदे,(रा.बीड शहर,बीड) व त्याच्या सोबत असणाऱ्या तीन अनोळखी इसमांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब निमसे यांची स्वतःच्या मालकीची ‘चॅम्पियन शुगर केन इन्फिल्डर अँड ट्रेलर’ नावाची सणसवाडी मध्ये कंपनी आहे. या कंपनीमध्ये ‘शुगर केन इन्फिल्डर आणि ट्रेलर’ तयार होतात. निमसे यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी दि १६ नोव्हेंबर २०२२ रोजी हरीश बाळासाहेब शिंदे या इसमाने फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन दोन शुगरकेन इन्फिल्डर मशीन बनवण्यास सांगितले. सदर दोन्ही मशीनची किंमत १७ लाख ५० हजार रुपये व जीएसटी ३ लाख १५ हजार रुपये असे एकूण २० लाख ६५ हजार रुपये अशी होती. त्यापैकी हरीश शिंदे यांनी फिर्यादी निमसे यांना १७ लाख ५० हजार रुपये दिले व जीएसटी चे ३ लाख १५ हजार रुपये शिल्लक ठेवले. त्यावेळी हरीश शिंदे हा १ शुगरकेन इन्फिल्डर मशीन घेऊन गेला. फिर्यादी यांनी दुसरे १ शुगर केन इन्फिल्डर मशीन तयार झाल्यानंतर तुम्ही दोन्ही मशीनचे एकूण जीएसटी बिल ३ लाख १५ हजार रुपये भरा असे सांगितले.

 

त्यानंतर दि १५ डिसेंबर २०२२ रोजी हरीश शिंदे हा फिर्यादी निमसे यांच्या कंपनीमध्ये येऊन मी जीएसटी चे बिल ३ लाख १५ हजार रुपये भरणार नाही. सदर मशीन हे शेती उपयुक्त आहे. त्यास जीएसटी लागत नाही. मला माझा जॉन डीअर ट्रॅक्टरला जोडून तयार केलेले शुगर केन इन्फिल्डर मशीन द्या असे म्हणाला. त्यानंतर फिर्यादी यांनी तुम्ही जीएसटी बिल भरुन तुमचा ‘जॉन डीअर ट्रॅक्टर व इन्फिल्डर मशीन’ घेऊन जा असे सांगितले. त्यावेळी शिंदे याने फिर्यादी यांच्याशी वाद केला अन निघून गेला.

 

त्यानंतर दि १३ जुन २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निमसे यांच्या सणसवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या कंपनीतुन पत्र्याच्या शॉपचे शटरचे लॉक ग्राइंडरने तोडुन हरीश बाळासाहेब शिंदे व त्याच्यासोबत असलेल्या ३ अनोळखी लोकांनी कंपनीमध्ये शिरुन त्याचा जॉन डीअर ट्रॅक्टर तसेच फिर्यादी यांच्या कंपनीतील शुगरकेन इन्फिल्डर मशीन व इतर बरेच मटेरियल असा एकूण ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असल्यामुळे त्यांच्यावर शिक्रापुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

15 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

17 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

17 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

22 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

2 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

2 दिवस ago