मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

शिरुर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून घटनास्थळी शिक्रापूर पोलीस तातडीने दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक मृतदेह जळत असल्याचे निदर्शनास आले मात्र मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने सदर मृतदेह पुरुषाचा की महिलेचा याबाबत काही माहिती समजू शकली नसून घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, तर शिक्रापूर पोलिसांचे शोध कार्य व तपास सुरू झाला आहे.

या घटनेचा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, जमादार चौधर, पोलीस नाईक विकास पाटील, शिपाई रावडे व शिवणकर इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

13 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

17 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

17 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

18 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago