मुख्य बातम्या

रांजणगावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, २०३ किलो ‘बंटा’ गोळ्यांसह तरुण ताब्यात

कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरात गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ नावाच्या तब्बल २०३ किलो ६०० ग्रॅम गोळ्या बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका तरुणास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पुणे ग्रामीण जिल्ह्यात अमली व तंबाखुजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात कठोर भुमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

दि. १० जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना, विपुल विटकर (रा. रांजणगाव गणपती) हा त्याच्या राहत्या घरात तसेच घराशेजारील पानटपरीत ‘बंटा’ नावाच्या गुंगीकारक, गांजा मिश्रित गोळ्या विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिस हवालदार तुषार पंदारे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करुन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करत शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने छापा टाकत हि मोठी कारवाई केली.

या छाप्यात आरोपीकडुन २०३ किलो ६०० ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित ‘बंटा’ गोळ्या ५७,३५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी विपुल संदीप विटकर (वय २० वर्षे) याच्याविरुद्ध सरकारतर्फे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असुन एनडीपीएस अ‍ॅक्ट, बीएनएस तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संगपाळ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, सागर धुमाळ, राजु मोमीण, राहुल पवार, रांजणगाव पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, विजय सरजिने यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास अविनाश थोरात हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago