मुख्य बातम्या

शिरुरच्या त्या डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला प्रकरणात आरोपीस ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नामांकित सरोदे हॉस्पीटलमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर न्यायालयाने आरोपीस दोन्ही कलमान्वये एकूण ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

फिर्यादी नारायण मारुती सरोदे (वय ५७, रा. हुडको कॉलनी, शिरूर) यांचे रामआळी येथे सरोदे हॉस्पीटल आहे. त्यांची पत्नी अलका सरोदे या शिरूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी व पत्नी हॉस्पीटलमध्ये असताना आरोपी सुरेश ज्ञानोबा ओतारी (रा. डंबेनाला, शिरूर) हा हातात लाकडी दांडका घेऊन हॉस्पीटलमध्ये शिरला. पैशांची मागणी करत त्याने शिवीगाळ केली व दांडक्याने फिर्यादीस मारहाण केली.

अलका सरोदे यांनी मध्ये पडताच त्यांनाही आरोपीने ढकलून धमक्या दिल्या. “तुमच्या मुलाचे लग्ण कसे होतो ते पाहतो. तुला जीवे मारून टाकतो” असे म्हणत आरोपी निघून गेला. आरोपी दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादींनी पोलिसांना कळविले होते. या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६). गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहे.प्रभारी अधिकारी म्हणुण पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व संतोष घोळवे,कोर्ट अंमलदार हवालदार तुकाराम गोरे व महिला पोलीस मनीषा फंड यांनी काम पाहीले

सदर प्रकरणाची सुनावणी जे. ए. झारी सो कोर्ट येथे झाली. सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी अभियोक्ता सागर वसंत कदम तसेच याप्रकरणी अ‍ॅड. शिवशंकर हिलाळ व अँड अक्षय घावटे यांनी फिर्यादीस मोलाचे मार्गदर्शन केले. सदर प्रकरणात आठ साक्षीदारांची साक्ष तपासून आरोपीने केलेला हल्ला सिद्ध झाला. (दि. १९) ऑगस्ट २०२५ रोजी न्यायालयाने आरोपी सुरेश ओतारी यासभादंवि कलम ३२३ खाली ६ महिने सक्त मजुरी,भादंवि कलम ४५२ खाली ६ महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावलीआहे. दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्र भोगावयाच्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. या निकालामुळे शिरूर शहरात समाधान व्यक्त होत असून, कायदा व सुव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास आणखी दृढ झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

1 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 दिवस ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

2 दिवस ago