मुंबई: समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून येत्या गणेशोत्सवात विद्येची देवता गणरायाचरणी हार, फुले, मोदकांसह वह्या पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावे असे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’ व ‘सुमनालय फाउंडेशन’ च्या वतीने राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
येत्या २७ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावेळी आकर्षक रोषणाई, देखावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. राज्यातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व व पक्ष संघटनांकडून स्तुत्य असे उपक्रमही राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून गणेशभक्तांनी दर्शनाला येताना हार फुले, मोदक, नारळ या पूजेच्या व प्रसादाच्या वस्तुसह आपापल्या परीने वह्या, पेन पेन्सिल स्कूल बॅग वापरात नसलेले जुने मोबाईल, टॅब पुस्तके, आदी शैक्षणिक साहित्य गणरायाचरणी अर्पण करावेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपल्या मंडळाच्यावतीने गणेशभक्तांना तसे आवाहन करावे , असे आवाहन ‘एक वही एक पेन अभियाना’ आणि ‘सुमनालय फाउंडेशन’ च्या वतीने करण्यात आले आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…