मुख्य बातम्या

शिक्रापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपीला बीड मधून घेतले ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेलेल्या धनराज मधुकर डोंगरे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून नुकतेच ताब्यात घेतले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला दमदाटी केल्याने महिलेच्या तक्रारी वरून शिक्रापूर पोलिसांनी ने २४ मार्च रोजी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी धनराज मधुकर डोंगरे (वय ३०) रा. चारदरी ता. धारूर जि. बीड याचेवर दाखल करत त्याला अटक केली होती. २४ मार्च रोजी रात्री उशिरा शिक्रापूर पोलिसांनी धनराज डोंगरे याला शिरुर पोलीस स्टेशन च्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असता शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धनराज डोंगरे हा हातातील बेडीसह पळून गेला होता.

दरम्यान शिरुर पोलीस स्टेशन येथे पुन्हा धनराज डोंगरे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अटकेतील आरोपी पळून गेल्याने पोलीस दलात खळबळ उडालेले असताना शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, गणेश करपे, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, निखिल रावडे, उद्धव भालेराव, जयराज देवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे राजू मोमीन यांनी सदर आरोपीचा शोध घेत बीड जिल्ह्यात गेले. अखेर आज सायंकाळच्या सुमारास बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर गावामध्ये धनराज डोंगरे आला असता पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याच्या जवळील बेडी देखील जप्त केली आहे. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपीला दोन दिवसात पुन्हा शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केल्याने शिक्रापूर पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.

धनराज डोंगरे हा २०२९ मध्ये कोठडीतूनच पळाला होता…

शिक्रापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला आरोपी धनराज डोंगरे हा यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटक असताना चक्क पोलीस कोठडीतूनच पळून गेला होता. मात्र त्यावेळी देखील दुसऱ्या दिवशी बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्या होती, अशी माहिती देखील शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

5 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

6 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

6 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

6 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

6 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

6 तास ago