रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील एका किराणा दुकानात सुमारे 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन फरार झालेल्या विजय लक्ष्मण गलांडे (वय 31 वर्षे) रा.सासवडरोड, गोंधळेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. पेरणेफाटा, ता. हवेली, जि. पुणे या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्याच्याकडुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनेसांगवी (ता. शिरुर) येथे रविंद्र गंगाराम डांगे यांचे जय मल्हार ट्रेडर्स नावाच्या किरणा दुकान असुन दि. 19 मार्च रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटर उचकटुन दुकानातील तेलाचे डबे, काजु, बदाम, खारीक, बेसन बॅग, मसाले, चहा पावडर, आट्टा, मँगी व रोख रक्कम असा एकुण 65 हजार 500 रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला होता. याबाबत रविंद्र डांगे यांच्या फिर्यादीवरुन (दि 20) मार्च रोजी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास करण्याबाबत रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथकातील पोलिसांना सुचना दिल्यानंतर तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत परिसरातील CCTV कॅमेरे चेक करण्यास सुरवात केली. तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणापासुन नगर पुणे हायवे रोडलगतच्या रांजणगाव, कोंढापुरी, शिक्रापुर कोरेगाव भिमा, पेरणे फाटा परिसरातील अंदाजे 70 ते 80 CCTV कॅमेरे सलग आठ दिवस लागोपाठ चेक केले.
त्यावेळी त्यांनी एका संशयीत तवेरा सारख्या दिसणा-या गाडीचा CCTV कॅमे-यावरुन पाठलाग केला असता सदरचा गुन्हा हा विजय लक्ष्मण गलांडे याने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास पथकातील पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे व उमेश कुतवळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विजय गलांडे याचे ठावठिकाणाबाबत माहिती घेवुन आरोपी विजय लक्ष्मण गलांडे यास (दि 26) मार्च रोजी अटक करण्यात आलेली असुन त्यास शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मंजुर केली असुन आरोपीकडुन चोरीस गेलेला 65 हजार 500 रुपयांचा सर्व माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश मिट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार वैभव मोरे, विलास आंबेकर यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…