मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकामध्ये 1 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-नगर महामार्गालगत गावी जाण्यासाठी गाडीची वाट बघत थांबलेल्या एका व्यक्तीला दोन अज्ञात चोरट्यानी लोखंडी पाईपाने डोक्यात तसेच पायावर मारहाण करत गंभीर जखमी करुन त्याच्याजवळील रोख रक्कम तसेच मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. याबाबत रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. परंतु सदरचे दोन्ही आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते. नुकतेच रांजणगाव पोलिसांना या आरोपीस अटक करण्यात यश आले आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बालाजी रामराव काटकर (रा. भोसरी, पुणे, मुळ रा. गंगाखेड, जि. परभणी) हे पुणे येथून त्यांच्या मुळगावी जात असतांना कारेगाव येथील यश-इन चौकात पुणे-नगर महामार्गालगत गाडीची वाट पाहत थांबलेले असतांना स्प्लेंडर मोटार सायकल क्र. MH 09 AV 8433 वरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ येवुन फिर्यादी बालाजी काटकर यांना लोखंडी पाईपाने डोक्यात तसेच पायावर मारहाण करुन गंभीर जखमी करत त्यांच्याकडील 8 हजार 300 रुपये रोख रक्कम आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकुण 14 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेला होता. याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

हा गुन्हा घडल्यापासुन तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी वेळोवेळी आरोपीच्या राहत्या पत्यावर तसेच शिरुर परिसरामध्ये शोध घेतला. पंरतु सदरचे दोन्हीही आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते. त्यामुळे आरोपिंनी वापरलेल्या मोटार सायकलच्या क्रमांकावरुन शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा आरोपी अथर्व धर्मा जाधव (रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गोपनिय बातमीदाराच्या मदतीने (दि 4) जुलै 2023 रोजी आरोपीस त्याच्या राहत्या घरातुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. अटक करतेवेळी आरोपीच्या ताब्यात असलेली आणि गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल क्र. MH 09 AV 8433 हि मिळुन आलेली असुन सदर आरोपीला शिरुर न्यायलयात हजर केले असता त्याला (दि 8) जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घिट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

50 मिनिटे ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago