मुख्य बातम्या

शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

कारेगाव (तेजस फडके) सध्याच्या युगात इंटरनेटमुळे मुलांना विविध विषयांचे ज्ञान उपलब्ध होत आहे. परंतु मोबाईलमुळेच आजचे विद्यार्थीही भरकटत चालले आहेत. पुर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांची आदरयुक्त भिती वाटतं होती. परंतु आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच चारित्र्यवान बनविने हे सध्या शिक्षकांपुढे मोठे आव्हान असल्याचे मत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी व्यक्त केले.

 

करडे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ विद्यालयात शिक्षकदिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत ढोले हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्यावेळी ढोले यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.

 

यावेळी प्रमुख वक्ते शंकर महाराज गणगे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर एखादं ध्येय साध्य करायच असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. पुर्वीच्या काळात शिक्षकांना मास्तर म्हणायचे कारण जो जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी धडपड करतो तो मास्तर असतो. तसेच प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकास हा मराठी शाळेतच होत असल्याचेही याववेळी गणगे यांनी सांगितले.

 

यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वर्षा निलेश पवार (उपशिक्षिका,भैरवनाथ विद्यालय,करडे), संतोष बबनराव थोपटे (जि प शाळा, घावटे मळा), प्रतिभा दत्तात्रय आबुज (जि प शाळा, कर्डेलवाडी), स्वाती शरद निंबाळकर (जि प शाळा, आंबळे), कुमुदिनी खंडू बोराडे (जि प शाळा, पाषानमळा, शिरुर) या सर्व शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.

 

यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, शिरुर खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाचर्णे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष शामकांत वर्पे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरुर शहर युवती अध्यक्षा गीता आढाव, सरदवाडीचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा घावटे, पत्रकार अरुणकुमार मोटे, सुभाष गोरे, राणी शिंदे, दिपाली आंबरे, अश्विनी जाधव, दुर्गा ननवरे, अश्विनी संकपाळ, भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पवळ, पर्यवेक्षक विलास चासकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास चासकर, सुत्रसंचालन अनिल गावडे तर आभार वर्षा पवार यांनी मानले.

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

भिक्षा नको, सुरक्षा दया रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने बदलापुर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार म्हस्के यांना निवेदन

रामलिंग येथे नागपंचमी निमित्त वंचित घटकातील लहान मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago