कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर प्रश्न
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईला सामोरे गेलेल्या महिला तलाठीवर पुन्हा एकदा लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार एकाच अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने विभागातील पारदर्शकता, अंतर्गत देखरेख आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एसीबीच्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे आणि एका कोतवालाविरुद्ध दोन कोटी रुपयांच्या दंडाची भीती दाखवून १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून महसूल विभागात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, आश्विनी कोकाटे या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे कार्यरत असतानाही त्यांच्याविरोधात एसीबीने लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी कारवाई केली होती. त्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली असून, पूर्वीपासून गुन्हा दाखल असलेल्या अधिकाऱ्यांची संवेदनशील पदांवर नियुक्ती कशी झाली, त्यांच्यावर विभागीय स्तरावर कोणती देखरेख ठेवली जाते, अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट संबंधित विभाग आहे. अशा विभागात वारंवार लाचखोरीची प्रकरणे उघडकीस येत असतील, तर शासनाने कठोर विभागीय कारवाई, नियमित चौकशी आणि पारदर्शक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…