शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या गंभीर समस्येबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली आहे. शिरूर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत तुंबलेली ड्रेनेज लाईन मोकळी करुन सांडपाण्याचा प्रश्न सोडविला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाबुरावनगर परिसरातील काही सोसायट्यांजवळील ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून सोसायटीच्या बेसमेंटमध्ये आणि निवासी भागात सांडपाणी साचत होते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव तसेच बोरवेलमध्ये पाणी उतरत असल्यामुळे दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सांडपाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागत होती.
या समस्येबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करताच शिरुर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत संबंधित यंत्रणेला तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन तुंबलेल्या ड्रेनेज लाईनची पाहणी केली. लाईनमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि अडथळे दूर करत काही ठिकाणी नवीन लाईन टाकुन सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर तसेच इमारतीच्या तळमजल्यात साचलेले सांडपाणीही कमी झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली.
सांडपाण्याची समस्या मांडल्यानंतर तातडीने कार्यवाही झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करुन प्रश्न सोडविल्याने उपसरपंच संजय शिंदे यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना शिरुर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे म्हणाले, बाबु रावनगर येथील बंदिस्त गटार योजनेच्या कामकाजाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ज्या ठिकाणी बंदिस्त गटार योजना तुंबली होती. त्या ठिकानाहून अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे गटार योजनेचा पाईप मधेच दबला गेल्याने गटार लाईनचे पाणी पुढे न जाता जागा मिळेल त्या चेंबर मधून बाहेर येऊ लागले होते. परंतु ग्रामपंचायतच्या वतीने गेल्या चार दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करत आम्ही त्यावर उपाययोजना म्हणुन ब्रेकरच्या साहाय्याने रस्ता फोडून जवळपास १५० फूट नवीन गटार लाईन मोकळी करुन त्या ठिकाणी नवीन पाइप टाकले. शिरुर ग्रामीण हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
बाबुरावनगर येथे आठ दिवसांपासुन सांडपाणी तुंबले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे ग्रामपंचायतने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा नेण्याचा इशारा माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी दिला होता. त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने तातडीने सांडपाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी नितीन बोऱ्हाडे यांचेही आभार मानले आहेत. शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीत मध्ये सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही समस्या असल्यास मी कायम जनसेवक म्हणुन सर्वसामान्य लोकांसाठी ठामपणे भुमिका मांडणार असल्याचे यावेळी माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी सांगितले. तसेच उपसरपंच संजय शिंदे यांनी सांडपाण्याबाबत तातडीने दखल घेत तात्काळ प्रश्न मार्गी लावल्यामुळे बोऱ्हाडे यांनी शिंदे यांचे आभार मानले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर करण्यात आलेल्या…
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेलच. आज बदललेली…
वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही…