‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना वेग
मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्यावी आणि मोठी घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लॉटरीत प्रतिसाद न मिळालेल्या घरांची ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर तातडीने विक्री करण्यासही सांगितले.
बैठकीत शिरूर (१५५.२२ कोटी) आणि खराबवाडी (८९.४७ कोटी) येथील प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता त्वरीत देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच दापोडी येथे ८ ते १० हजार घरांचा प्रकल्प, म्हाळुंगे-इंगळे येथील पायाभूत सुविधा, खराडीतील भूखंड, तसेच सांगली व मिरजमधील परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, विद्यार्थी आणि नोकरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या महिलांसाठी भाडेतत्त्वावर वर्किंग वुमन हॉस्टेल आणि विद्यार्थी वसतिगृहे सुरू करण्याचाही प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व प्रकल्पांसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करून प्रत्येक प्रस्तावाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…