मुख्य बातम्या

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचे अपहरण करुन त्याचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या सर्व प्रकरणावर आमदार अशोक पवार यांनी अस्वस्थपणे त्यांची भूमिका मांडली आहे. दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय.. या चार शब्दांचा कॅप्शनमध्ये उल्लेख करत अशोक पवार यांनी त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आमदार अशोक पवार म्हणाले, ‘दुर्दैवी घटना घडली, घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात. आज माझ्या मुलाला मोटारसायकलवर असताना एकानं प्रचार करण्यासाठी नेलं, जवळच्या वस्तीत नेलं, तिथं गेल्यावर कोंडलं, त्याचा गळा पट्टीनं की फडक्यानं आवळला. त्याला सांगितलं तू कपडे काढ, एका महिलेला विवस्त्र करुन अत्यंत घृणास्पद प्रकार केला. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे चांगलं वागतो, समाजाशी एकरुप होतो पण मनाला वेदना झाल्या, कुठल्या थराला जाणार आहेत ही लोकं.’

काही लोकं भेटायला आले ते म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय आहे. खरं म्हणजे आमच्या सारख्याचं मन एकदम बेचैन झालं आहे. लोकशाहीत निवडणूक लोकशाही पद्धतीनं तुम्ही लढा. असे घृणास्पद प्रकार करुन आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचं आहे का, अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. म्हणजे काळ यांना माफ करणार नाही. आता पोलीस खात्याला मी विनंती केली याची बारकाईनं चौकशी करा, याचा कोण सूत्रधार आहे हे शोधलं पाहिजे, समाज यांना माफ करणार नाही. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांना कुणी याच्यामध्ये कृत्य करण्यास भाग पाडलं असेल तो खरा माणूस शोधणं पोलीस खात्याचं लक्ष्य असलं पाहिजे. कारण यांना माफ केलं नाही पाहिजे. कुटुंबाला बदनाम करणं दु:खद अशी घटना आहे, असेही अशोक पवार म्हणाले.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ‘आमदार अशोकबापू पवार यांच्या मुलाच्या बाबतीत घडलेली घटना गंभीर आणि संतापजनक आहे. एका लोकप्रतिनिधीच्या मुलाचे अपहरण होते, त्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात येते आणि त्यानंतर त्याचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करण्यात येते. हा एकंदर प्रकार महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या कशा चिंध्या उडाल्या आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे सपशेल फेल ठरले याचे प्रत्यंतर देणारी आहे.’

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago