ashok-pawar

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास विकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार प्रचारा दरम्यान निमगाव म्हाळुंगी येथे गावभेट दौऱ्यावर असताना भाषण करताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी एरव्ही कठोर वाटणाऱ्या अशोक पवार यांच्या हळव्या स्वभावाची सर्वांनाच प्रचिती आली अन् यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रु दाटून आले.

वाघोली येथे एका मुलीला डंपरने धडक दिल्याने अपघात झाला होता. यावेळी योगायोगाने आमदार अशोक पवारही तेथून जात होते. अशोक पवार यांनी गाडी थांबवत त्या अपघातग्रस्त मुलीला मदत करत पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलीची भेट घेत तिला हॉस्पिटलमधील उपचारासाठी मदत केली.

परंतु, उपचारादरम्यान त्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिरुर तालुक्यात गावभेट दौऱ्यावर असताना उपस्थित लोकांना हा प्रसंग सांगताना अशोक पवार भावुक झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे उपस्थित लोकांच्याही डोळ्याच्या कडा पाणवल्या. त्यामुळे एरव्ही विरोधकांच्या कोणत्याही टिकेला न घाबरता सडेतोड उत्तर देणाऱ्या अशोक पवारांच्या हळव्या स्वभावाची उपस्थित लोकांना प्रचिती आली.

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी अशोक पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरूर-हवेली मतदार संघामधून आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल?

View Results

Loading ... Loading ...

1 thought on “Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

  1. तुम्ही अशोक पवार च parachar करायचं बंद करा
    घोडगंगा कारखान्याचे प्रचार करायचे बंद करा

Comments are closed.