शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदारसंघातील काँग्रेस पक्ष एकदिलाने, एकमताने महाविकास आघाडीचे काम करून आमदार अशोक पवार यांना पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करण्याचा प्रयत्नात आहे. त्यांना जादा मतधिक्याने निवडून आणण्याच्या चंग कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बांधला आहे. विकासकामांच्या जोरावर अशोक पवार पुन्हा विजयी होतील, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या आदेशाने शिरूर तालुका काँग्रेस समितीची तातडीची बैठक माजी नगरसेविका संगीता मल्लाव यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी अशोक पवार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही, असे सांगत तळेगाव ढमढेरे येथील बैठकीत निवडणुकीत काम करायचे नाही, असे ठरविण्यात आल्याचे सांगितले होते. त्याला सडेतोड उत्तर काँग्रेस पक्षातील दुसऱ्या गटाने या बैठकीतून दिले आहे.
नगरसेविका संगीता मल्लाव यांच्या घरी आयोजित बैठकीत किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास थोरात, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रियंका बंडगर, महाराष्ट्र प्रदेश विभागीय अध्यक्ष विजय डिंबर, शिरूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमजद पठाण, शिरूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माजी नगरसेविका संगीता मल्लाव, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अजीम सय्यद, पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा वाकचौरे तसेच तालुका कार्याध्यक्ष पोपट वाकचौरे, पुणे जिल्हा फिशरमेन काँग्रेसचे अध्यक्ष शंतनु मल्लाव, शिरूर शहर युवती अध्यक्ष ज्योती हांडे, शिरूर शहर उपाध्यक्ष युवक कॉंग्रेस ललित गुगळे, शिरूर काँग्रेसचे युवक सरचिटणीस सोहेल शेख उपस्थित होते. या बैठकीत एकमुखाने अशोक पवार यांना पाठिंबा देण्यात आला. शिरूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण आंबेकर हे आजारी असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांनी एकमुखाने अशोक पवार यांच्या पाठीशी असल्याचे दूरध्वनीवरून सांगितले.
अशोक पवार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर कुठलाच अन्याय केला नसून उलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वांत जास्त शासकीय कमिटीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची नियुक्ती त्यांच्या पुढाकाराने करण्यात आली. कुठल्याही प्रकारच्या कामासाठी अशोक पवार यांनी सहकार्य करून ते लगेच मार्गी लावले आहे, असे मत बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या धर्माचे पालन करून कुणीही काँग्रेस पक्ष स्वतःचा असल्यासारखे न वागता विधानसभा निवडणुकीत अशोक पवार यांचे काम कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रमाणिकपणे करावे, असे बैठकीत ठरविण्यात आले.
शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी अशोक पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज…
मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर
घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…
शिरूरला तहसिलदार दया, नाहीतर बेमुदत उपोषण आमदार अशोक पवार आक्रमक