ashok-pawar-pradip-kand-mauli katke

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या निमित्ताने ऐन थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड अशोक पवार यांनी सुरवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात अशोक पवार यांचे कार्यकर्ते तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचं चिन्ह ‘तुतारी वाजविणारा माणुस’ हे मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.

अ‍ॅड. अशोक पवार यांनी पाच वर्षात केलेली शिरुर-हवेली मतदारसंघात शहरी तसेच ग्रामीण भागात केलेली कोट्यावधींची विकासकामे, मतदारसंघातील सर्वसामान्य व्यक्तींना अनेक प्रकारच्या आजारांच्या औषधोपचारांसाठी लाखों रुपयांची बिल येतात. ती बिल सरकारी कोट्यातुन सवलतीत बसवुन सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पवार यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मतदार अशोक पवारांच्या पाठीमागे ठाम उभे असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे.

महायुतीत बिघाडी अन् बंडाळी…
महायुतीच्या वतीने माऊली कटके यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाकडुन इच्छुक असणाऱ्या प्रदीप कंद यांनी आपल्या समर्थकांचा पेरणे फाटा येथे ‘निर्धार मेळावा’ घेत विधानसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच शिरुर येथे भाजपाच्याच काही पुढाऱ्यांनी एक बैठक घेत राहुल पाचर्णे यांना आपला नेता घोषित केले आहे. तर अजित पवार गटाचे शांताराम कटके यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा मध्ये शिरुर आणि हवेली असे दोन गट पडलेत का…? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

महायुतीचे बंडखोर उमेदवार शांताराम कटके यांनी भरला अपक्ष अर्ज…

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

शिरूर-हवेली मतदार संघामधून आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल?

View Results

Loading ... Loading ...