मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे एका व्यक्तीवर दोन भावांनी मिळून तलवार व दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला असुन या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभिजीत नंदू बत्ते (वय २९) रा. राजमुद्रा हॉटेल पाठीमागे, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन आकाश संजय बत्ते तसेच विकास संजय बत्ते (दोघेही रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दि. ४ जुन २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अभिजीत बत्ते यांच्या कपाळावर तलवारीने वार करुन पाठीत दगडाने मारले. फिर्यादीच्या घरासमोरच हि घटना घडली.

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याचा राग मनात धरुन आरोपी आकाश बत्ते याने लोखंडी तलवारीने कपाळावर वार केला, तर विकास बत्ते याने दगडाने पाठीत मारून दुखापत करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप अभिजित बत्ते यांनी केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गुलाब येळे हे करत आहेत.

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

शिरुरमध्ये अज्ञात पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago