शिरुरमध्ये अज्ञात पिकअप चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; गुन्हा दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील बाबुराव नगर येथे पुणे-नगर महामार्गावर दि ६ जून २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली असुन या अपघातात एका स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात पिकअप चालकाविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संभाजी शिवाजी सरड (वय ५०) मूळ रा. बाभुळसर पूर्व, सध्या रा. बाबुराव नगर, संग्राम अपार्टमेंट, शिरुर) हे स्वतःची स्विफ्ट कार क्रं एम एच १२ पी झेड ०३६४ घेऊन रस्ता पार करत होते. त्याचवेळी नगर कडून पुणे कडे जाणाऱ्या एम एच १२ डब्ल्यू एक्स ६१२४ क्रमांकाच्या पिकअप जीपने भरधाव वेगात त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

या धडकेत कारच्या पुढील टायर व बोनेटचे नुकसान झाले असुन अपघातानंतर संबंधित पिकअप चालक घटनास्थळावरुन पळून गेला. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहायक फौजदार साबळे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.