मुख्य बातम्या

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे) रांजणगाव गणपती येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांचा मोबाईल शॉपीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, समोरच्याच बाजूला असलेल्या गॅस एजन्सीचे शटर तोडून चोरांनी पंधरा हजार रुपये लंपास केले आहेत. हा सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शिरुर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटना थांबता थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

रांजणगाव गणपती येथे अज्ञात चोरट्यांनी आधी मोबाईल शॉपीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर गॅस एजन्सीचे शटर उचकटचुन गल्ल्यातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे रुपेश आबासाहेब रणसिंग (वय १९, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी रुपेश रणसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार दि १० ऑगस्ट २०२५ रात्री ७ ते ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० च्या दरम्यान रणसिंग यांच्या मालकीच्या मनीषा भारत गॅस एजन्सीच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने गल्ल्यातील १५ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार गुलाब येळे हे करत आहेत.

Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या

Video; शिरुरचे DYSP अडचणीत येण्याची शक्यता; नक्की काय आहे प्रकरण…?

Video; मांडवगण फराटा जि. प. शाळेच्या हद्दीत गाळे; गाळेधारक व पोलिसांत तणाव

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

6 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

6 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

7 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

12 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

12 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

12 तास ago