Video; शिरुरचे DYSP अडचणीत येण्याची शक्यता; नक्की काय आहे प्रकरण…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर विषयात अहवाल सादर करण्यासाठी आणि प्रकरण दाबण्यासाठी शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकाकरवी लाच मागितली. परंतु लाच देण्यास नकार दिल्यानंतर ॲट्रॉसिटी प्रकरणात आमची कसलीही चुक नसताना आमच्या विरोधात अहवाल सादर केला, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप हवेली तालुका शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख विपुल हनुमंत शितोळे यांनी केला आहे.

विपुल शितोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि १६ एप्रिल २०२४ रोजी वाघोली येथे त्यांचा मित्र प्रवीण सोनवणे व त्यांच्या पत्नी व लहान मुलाला नगरच्या काही व्यक्तींनी गाडीला गाडी घासल्याने मारहाण केली होती. त्यानंतर शिक्रापुर येथे पुन्हा त्याच लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी वाद मिटविण्यासाठी गेलेल्या विपुल शितोळे आणि प्रसाद नाळे यांनाही मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्या प्रकरणाची फिर्यादही शिक्रापुर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, संबंधित आरोपींनी काही दिवसानंतर विपुल शितोळे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात खोटा ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात शिरुरचे उपविभागीय अधिकारी (DYSP) प्रशांत ढोले यांनी शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या मार्फत संपर्क साधत “गुन्हा मिटवून घेण्यासाठी” पन्नास हजार रुपयांची मागणी केली, असा गंभीर आरोप शितोळे यांनी केला आहे.

शितोळे यांनी लाच देण्यास नकार दिल्यानंतर DYSP प्रशांत ढोले यांनी नगरच्या आरोपीशी संगनमत करुन ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत शितोळे आणि त्यांच्या सहकार्याविरोधात खोटा अहवाल कोर्टात दाखल केल्याचा आरोपही शितोळे यांनी केला आहे. या संदर्भात शितोळे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करुन संबंधित मुजोर अधिकार्‍याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या ‘प्रतिनिधी’ ने पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर DYSP ढोले यांच्याशी संपर्क साधला असता, मी सुट्टीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शिरुरचे DYSP प्रशांत ढोले यांची मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे.

विपुल शितोळे (तालुकाप्रमुख)

शिवसेना (शिंदे गट) हवेली 

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा

DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

रांजणगाव एमआयडीसीत DYSP यांच्या ऑफिस समोरुनच बेकायदेशीर मुरूम वाहतूक…?