ranjangaon-midc-police station
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ५५ लाख २, १५६ रुपये किंमतीचे ६, ६४३ बिस्कीट बॉक्स फसवणुक करत चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी ओंकार रोडे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) फरार आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे नजीर इकबाल पठाण यांनी फिर्याद दाखल केली असुन दि २० जुलै २०२५ ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, कंपनीचा माल भिवंडी येथे पोहोचविण्याच्या बहाण्याने आरोपीने ट्रान्सपोर्ट कंटेनर चालकांना खोटे चलन व ई-वे बिल पाठवून माल कामशेत व छत्रपती संभाजीनगर येथे उतरवून घेतला असुन बनावट शिक्के व दस्तऐवज वापरून ही फसवणूक करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी धाड टाकून २ कंटेनरमधील २० लाख रुपये किंमतीचे १८०० बॉक्स जप्त केले. उर्वरित माल व आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, यांनी केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करीत आहेत.
रांजणगावच्या महागणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी
रांजणगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एक आरोपी अटक
Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…