मुख्य बातम्या

“शिरूर तालुका डॉट कॉम” च्या वृत्ताने व्यापारी संकुलाच्या भूमिपुजनाचे प्लेक्स उतरवले

नगर परीषद प्रशासनाकडून भुमिका स्पष्ट, राष्ट्रवादीची प्लेक्स बाजी फसली

 

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील एस.टी. स्टॅण्डसमोर नगर परीषदेच्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज (दि. १६) सांयकाळी आयोजीत केला असुन यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार जाहीरातबाजी करत शहरात प्लेक्स लावले होते. त्यात इतर पक्षांना अतिशय खुबीने डावलून स्वतःचा उदो उदो करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांकडून होत असल्याचे वृत्त “शिरूर तालुका डॉट कॉम”ने प्रसिद्ध करताच तातडीने हालचाली होऊन रात्रीत हे प्लेक्स काढले आहेत. याची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती. दरम्यान नगरपरिषद प्रशासणाने भुमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा डाव फसल्याची चर्चा शिरूर शहरात आहे.

शिरुर शहरातील प्रसिद्ध उदयोगपती प्रकाश शेठ धारीवाल यांनी सर्वपक्षीयांना एकत्र घेत नगर परिषदेवर सत्ता प्रस्थापीत केली. शिरुर शहराचा विविध विकास कामांच्या माध्यमातून कायापालट करणाच्या प्रयत्न ते करत आहे. शिरुर शहराच्या विकासात माजी नगराध्यक्षा तथा उद्योगपती स्व.रसिकलाल धरिवाल यांचे मोठे योगदान आहे. शिरुर शहरातील कुठल्याही विकास कामातील कार्यक्रमात त्यांचा फोटो असणे महत्वाचे आहे. परंतु शिरूर नगर परिषद व्यापारी संकुल भूमिपूजन समारंभ या कार्यक्रमात त्यांचा बॅनर तसेच विविध वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातींमध्ये रसिकलाल धरिवाल यांचे छायाचित्र असणे आवश्यक होता. त्यांचे छायाचित्र नसल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे.

शिरुर शहरात व्यापारी संकुल व्हावे ही धारीवाल यांची कायम इच्छा होती. त्यासाठी त्यांनी ही जागा त्याच्या शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता असताना शासनाकडून विकत घेतली होती. शिरूर शहराच्या विकासकामात त्यांचाही फोटो असायला हवा अशी शिरूरकरांची इच्छा आहे, परंतु धरिवाल यांचे छायाचित्र प्लेक्सवर का घेतले नाही हा प्रश्न शिरूरकरांना पडला आहे.

नगर परिषदेला कार्यक्रमाची माहीतीच नाही; बोरकर या विषयीनगर परीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी धक्कादायक माहीती दिली असून ते म्हणाले की ,नगर परीषदेने असा कोणताही कार्यक्रम आयोजीत केला नसून या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना आम्हाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा स्वयंघोषित कारभार तोंडघशी पडला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago