varsha-usgaonkar
मुंबईः बिग बॉस मराठीचे 5वे सीजन गाजत असून, बिग बॉसच्या घरात मोठा वाद बघायला मिळाला.एका टास्कमध्ये निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांना आईची माया काय समजणार? असे थेट म्हटले. निकी तांबोळी हिचे हे विधान ऐकून विविध चर्चांना उधाण आले आहे. रितेश देशमुख याने निकी तांबोळी कान उघाडणी केल्यानतंर तिने वर्षा उसगांवकर यांची माफी मागितली.
वर्षा उसगांवकर यांचा विवाह 2000 मध्ये अजय शर्मा यांच्यासोबत झाला. वर्षा उसगांवकर यांचा विवाह कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या बहिणीच्या घरी पार पडला. वर्षा उसगांवकर आणि अजय शर्मा यांच्या लग्नाला आता तब्बल 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण, त्यांना अपत्य नाही. निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांना आईची माया काय समजणार? म्हटल्यावर त्यांनी थेट म्हटले की, मुले होऊ देणे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू, यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.
अजय शर्मा यांच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर वर्षा उसगांवकर या अभिनेता नितिश भारव्दाजच्या प्रेमात पडल्या होत्या. हेच नाही तर सेटवर यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यावेळी अशी चर्चा होती की, वर्षा उसगांवकर आणि नितिश भारव्दाज हे लग्न देखील करतील. मात्र, काही वर्षांनी यांचे रस्ते वेगळे झाले.
दरम्यान, वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फक्त मराठीच चित्रपट नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही धमाका केलाय. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सहभागी झाल्या, त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…